शिरूर नगर परिषद, शिरूर, जि. पुणेमो. 99224 91555
मराठीEnglish
Testimonials

नागरिकांचे अभिप्राय

शिरूर शहरातील नागरिकांनी विकासकामे, तत्पर प्रतिसाद आणि लोकाभिमुख नेतृत्वाबद्दल व्यक्त केलेले अनुभव.

santosh shitole यांचा अभिप्राय

santosh shitole

नागरिक अभिप्राय
शिरूरच्या "लेडी तुकाराम मुंडे " नगराध्यक्ष ऐश्‍वर्याताई पाचर्णे तुमच्या सामाजिक जाणिवेला सलाम !!
दुर्दैवाने आज सगळीकडे अन्न भेसळ वाढत असल्यामुळे, भेसळयुक्त पदार्थ खाल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. सकाळी उठून अमृत म्हणून जे दूध पितो त्या दुधापासून तसेच खडू मिसळलेल्या पिठापासून ते कृत्रिमरित्या पॉलिश केलेल्या तांदळापर्यंत आणि रासायनिक घटक असलेल्या मसाल्यांपर्यंत, जेवणानंतर आवडीने खाणाऱ्या आईस्क्रिम पर्यंत भेसळ शांतपणे आणि धोकादायकपणे दैनंदिन जीवनात शिरली आहे.
आजची तुमची धडक मोहीम ही शिरूर शहर व आजूबाजूच्या अंगण वाड्यातील लहाण जीवांच्या अन्नातील भेसळ तर थांबवेलच आणि शिरूरकरांना त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न यावर विचार करायला भाग पाडेल हे मात्र नक्की !!
आपण आज जे निर्भीडपणे सामाजिक कर्तव्य पार पाडले ते खरोखर प्रशंसनीय आहे .
Dnyaneshwar Bhalekar यांचा अभिप्राय

Dnyaneshwar Bhalekar

नागरिक अभिप्राय
युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती, खुप चांगल काम केलं आदरणीय नगराध्यक्ष ताई, 🚩🚩
राहुल बोराडे यांचा अभिप्राय

राहुल बोराडे

शांतीनगर
खरंच नगराध्यक्ष पाचर्णे मॅडम व उपनगरअध्यक्ष मितेश भैया गादिया व हयांच आभार मानावे तेवढे कमीच आहे.
गेले अनेक वर्षे शांतीनगर मधील झाडांची समस्या गंभीर होती. अनेक वर्षे भरपूर नेते असेल किंवा नगरसेवक असेल आम्हाला आश्वासने देऊन गेले होते.
पण खऱ्या अर्थाने देवाच्या रुपाने आम्हाला हया समस्या बाहेर काढण्यासाठी मॅडम आणि भैया आले त्यांनी अनेक लोकांच्या डोक्यावरचा बोजा कमी करण्याच काम केले.
खरंच मी व माझ्या शांतीनगर मधील सर्व लोकांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या कामाची पोच पावती म्हणून तुम्हाला आजच शब्द देतो येणाऱ्या काळात नक्कीच मी व माझ्या शांतीनगर परिसरातील सर्व नागरिक तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील ह्याची मी तुम्हाला खात्री देतो 🙏🏻
तुमचाच विश्वासू
राहुल बोराडे
sunny gaware यांचा अभिप्राय

sunny gaware

नागरिक अभिप्राय
शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक पणे आहोरात्र काम करणार नेतृत्व....🔥🔥
ravishirsath यांचा अभिप्राय

ravishirsath

नागरिक अभिप्राय
जनतेच्या सुख-दुःखात सदैव तत्पर असणारे आणि आपल्या कर्तव्यालाच परमेश्वर मानणारे कर्तव्यनिष्ठ महिला नेतृत्व! 🤝 आपल्या दूरदृष्टीमुळे आणि अखंड जनसेवेमुळे आज शिरूर परिसराचा विकास वेगाने होत आहे. आपल्या या उत्कृष्ठ समाजकार्याला आणि ऊर्जादायी नेतृत्वाला मनापासून सलाम! 🙏✨
Nilesh Jagtap यांचा अभिप्राय

Nilesh Jagtap

नागरिक अभिप्राय
अश्या नगरआध्यक्षा प्रत्येक शहराला मिळायला हव्या...
Neeta Raskar यांचा अभिप्राय

Neeta Raskar

नागरिक अभिप्राय
मॅडम खूप चांगलं काम करत आहे आम्हास चांगले नगर अध्यक्ष लाभल्या तुमच्या कार्याला सलाम