आढावा
शिरूर शहर व परिसरातील काही नागरिकांनी शासकीय कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नगरपरिषदेकडे मांडली.
तक्रारीची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे यांनी संबंधित पीडित महिलांसोबत बैठक घेतली, वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्यानंतर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन देऊन सखोल चौकशी व आवश्यक कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली.
नागरिकांची दिशाभूल होऊ नये यासाठी अधिकृत माहितीची पडताळणी आणि जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला.
शिरूर नगरपरिषदेची कार्यवाही
- पीडित महिलांशी प्रत्यक्ष चर्चा.
- तक्रारींची प्राथमिक माहिती संकलित.
- शिरूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन.
- निष्पक्ष चौकशीची मागणी.
- दोषी आढळणाऱ्या संबंधित व्यक्तींना कामावरून कमी करण्यात येईल.
- संबंधित प्रकरणाची माहिती मा.ना.कु. आदितीताई सुनिल तटकरे,मंत्री, महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई. यांच्याकडे पाठविण्यात आली व संबंधितांवर योग्य प्रशासकीय कारवाई करण्याची विनंती करण्यात आली.
- संबंधित प्रकरणाची माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविणे.
- नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
दस्तऐवज
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
शिरूर नगरपरिषदेमार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याची कोणतीही योजना थेट राबविली जात नाही. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था नगरपरिषदेच्या नावाने पैसे, प्रोसेसिंग फी किंवा इतर शुल्क मागत असल्यास नागरिकांनी प्रथम संबंधित अधिकृत शासकीय कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी.
नागरिकांनी काय करावे?
- अधिकृत माहितीची पडताळणी करावी.
- कोणालाही रोख रक्कम देण्यापूर्वी खात्री करावी.
- संशयास्पद प्रकार त्वरित पोलिस किंवा संबंधित प्रशासनाला कळवावा.
- फसवणुकीची शक्यता वाटल्यास पुरावे जतन करावेत.
प्रेस कव्हरेज

शासकीय कर्जाचे आमिष दाखवून कथित फसवणूक
शिरूरमध्ये १०० हून अधिक महिला व पुरुषांची लाखो रुपयांची कथित फसवणूक झाल्याबाबत वृत्त.

संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा
प्रकरणाची पार्श्वभूमी, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय प्रतिसाद यांचा व्हिडिओ आढावा.

पैसे परत मिळवून देण्याची मागणी
नगरसेवक उमेश शेळके यांनी संबंधित नागरिकांना पैसे परत मिळवून देण्याची मागणी केल्याबाबत वृत्त.
पुढील कार्यवाही
- संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा पाठपुरावा.
- नागरिकांमध्ये जनजागृती.
- शासकीय योजनांबाबत अधिकृत माहितीचा प्रसार.
- आवश्यक असल्यास संबंधित विभागाशी समन्वय.
फोटो

पीडित महिलांशी चर्चा
तक्रारीची माहिती जाणून घेण्यासाठी पीडित महिलांसोबत प्रत्यक्ष संवाद.

मा.ना.कु. आदितीताई सुनिल तटकरे यांच्याकडे पत्र
संबंधितांवर योग्य प्रशासकीय कारवाईची विनंती करणारे अधिकृत निवेदन.